Events

Unnayan Youth & Kids Academy – Malkhamb

IMG-20160502-WA0029
Gymnastics, Yoga and Malkhamb demonstration on the occasion of Maharashtra Din, by New English School, Vasai students and their professional national level instructors:
IMG-20160502-WA0031 IMG-20160502-WA0030 IMG-20160502-WA0029 IMG-20160502-WA0028 IMG-20160502-WA0027 IMG-20160502-WA0022 IMG-20160502-WA0023 IMG-20160502-WA0024 IMG-20160502-WA0025 IMG-20160502-WA0026
Unnayan Youth & Kids Academy  – एक नवी सुरुवात
Unnayan Toursच्या नेहमीपेक्षा वेगळ्या, अपरिचित पर्यटन स्थळांच्या सहली सुरु होऊन आता जवळजवळ ७ वर्ष होत आली. तरी अजूनही वेगवेगळ्या, नवनवीन कल्पना मनात रुंजी घालतच असतात.

आजच्या लहान मुलांना नावं तर बहुतेक सगळेच ठेवत असतात. ऐकत नाहीत, मस्ती करतात, वगैरे वगैरे… पण ह्याच लहानग्यांच्या अंगी असलेली प्रचंड उर्जा फारशी कोणीच लक्षात घेत नाही. हीच उर्जा कुठेतरी मार्गी लावावी, ह्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं असं फार वाटत होतं.

आम्ही राहतो त्या वसई – विरार परिसरात मल्लखांब व जिम्नॅस्टीक ह्या सर्वांगाला व्यायाम देणाऱ्या क्रीडाप्रकारांचं प्रशिक्षण फारसं कुठेच उपलब्ध नव्हतं. मी स्वतः मल्लखांब व जिम्नॅस्टीकसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराचा विद्यार्थी. काही वर्ष तिथे प्रशिक्षण घेऊन वासंतिक शिबिरात प्रशिक्षक म्हणूनही काम केलेला. पण माझ्या आठ वर्षांच्या मुलीला मात्र इच्छा असूनही, केवळ वसईपासून दादर लांब आहे ह्या एकाच कारणामुळे  हे प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकत नव्हतं. हि बोच कुठेतरी मनात होतीच.

आणि मग ठरलं… केवळ माझ्या मुलीसाठीच नाही, तर परिसरातील सगळ्याच लहान मुला-मुलींसाठी मल्लखांब व जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षण वर्ग सुरु करायचे. ह्याच संकल्पनेतून मग सुरुवात झाली उन्नयन युथ अँड किड्स अकॅडमीची.

बघता बघता डिसेंबर २०१५ पासून जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षण वर्ग सुरु झाले सुद्धा. राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक ह्या मुलांना मार्गदर्शन करू लागले.

ह्याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०१६ च्या कालावधीत वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलामुलींसाठी संपन्न झालेलं मल्लखांब व जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षण शिबीर. ५ ते १५ वयोगटातील सुमारे ३५ मुलं-मुली ह्या शिबिरात सहभागी झाली होती. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचं मार्गदर्शन ह्या शिबिरार्थीना सलग १० दिवस मिळत होतं. काल १ मे २०१६ रोजी ह्या शिबिराचा समारोप, शिबिरातील सहभागी मुलांच्या केवळ अप्रतिम अशा प्रात्यक्षिकांनी झाला.

शिक्षकांनी, पालकांनी केलेल्या कौतुकाने मुलांची  आणि त्यांच्या प्रशिक्षकांची गेल्या १० दिवसांची मेहनत सफळ झाली.

आणि आम्हाला अजून नवीन काहीतरी करण्यासाठी नवा हुरूप मिळाला.

Special Thanks to coaches Hitesh Sadanand Sangale and  Prathamesh Sadanand Sangale

 

Leave a Comment

Visit Our Forum